PostImage

Vaingangavarta19

Today    Follow

PostImage

आरोपीला पकडण्यात अपयश आल्याने बौद्ध बांधवांचा शांतीच्या मार्गाने आंदोलन


आरोपीला पकडण्यात अपयश आल्याने बौद्ध बांधवांचा शांतीच्या मार्गाने आंदोलन 

आरोपीला अटक केल्याशिवाय गप्प बसणार नाही - समाज बांधवांची आक्रमक भुमिका 

चामोर्शी : तालुक्यातील आंबोली व किष्टापुर येथे अज्ञात समाज कंठक व्यक्तीने आंबोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या सुरक्षा भिंतीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानजनक अश्लिल शब्द व मानवि गुप्तागांचे चित्र काढलेले होते. सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन आष्टी येथे दिनांक २६/०३/२०२५ रोजी पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन आष्टी यांना तक्रार (फिर्याद) नोंदविण्यात आलेली होती परंतु पोलीस प्रशाषणाला आरोपीला पकडण्यात अजून पर्यंत यश मिळालेले नाही. म्हणून बौध्द अस्मीता रक्षण समिती येनापुर परीसर व समाविष्ठ असलेले समाज मंडळ यांच्या तर्फे दिनांक ०६/०४/२०२५ ला बौध्द बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शांन्ततेने व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केले. याअगोदर तालुक्यातील सोमनपल्ली येथील बसथांब्यावर अशाच प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानजनक अश्लील शब्दात लिखाण केले होते. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलास अटक केली. परंतु पुन्हा आंबोली, किष्टापूर येथे अज्ञात समाज कंठक व्यक्तीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानजनक अश्लील शब्दात लिखाण केले. त्यामुळे बौद्ध अस्मिता रक्षण समिती येनापूर यांच्या वतीने परिसरातील बौद्ध बांधवांनी येनापूर येथील बाजारपेठ बंद करून शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. यावेळी येनापूर परिसरातील बौद्ध बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. व पोलीसांचा यावेळी कडेकोट बंदोबस्त होता.


PostImage

Vaingangavarta19

Yesterday    Follow

PostImage

जीव गेल्यानंतर अनखोडा - कढोली मार्गावरील नाल्याच्या पुलावरील खड्डा बुजविणार …


 जीव गेल्यानंतर अनखोडा -  कढोली मार्गावरील नाल्याच्या पुलावरील खड्डा  बुजविणार काय ?

बरेच अपघात होऊनही शासनाचे दुर्लक्ष 


आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा कढोली- जैरामपुर मार्गावरील नाल्यावर पुलीयाच्या बाजुने 
 2023 मध्धे नाल्याला पुर आल्याने पुलीयाच्या बाजुने खड्डा  पडून  दोन वर्षे झाले बरेचसे दुचाकीस्वार  यांचे रात्रीच्या वेळी अपघात झाले तरीही अधिकारी लक्ष्य देउन काम करीत नाही शासकिय बांधकाम विभाग सुस्त झोपेत असल्याचे दिसून येते आहे 
 सदर पुलीयावरुन  गडचिरोली जिल्यातील आमदार व खासदार 
तथा अधिकारी या  पुलावरुन आजपर्यंत प्रवास केलेला नाही त्यामुळे या बाबींकडे त्यांचे लक्ष नाही  त्या खड्यात रात्रोचे सुमारास बरेच दुचाकीस्वार कोसळले आहेत एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर शासनाला जाग येणार आहे काय?  असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे 

या बाबीची त्वरित दखल घेऊन तो जीवघेणा खड्डा बुजवून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे


PostImage

Vaingangavarta19

Yesterday    Follow

PostImage

मंत्री महाजनांचे महिला आयएएससोबत संबंध ? खडसेंचा दावा, शाहांकडे आहेत …


मंत्री महाजनांचे महिला आयएएससोबत संबंध ? खडसेंचा दावा, शाहांकडे आहेत कॉल रेकॉर्ड

मुंबई:-

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत, असा दावा खडसे यांनी एका पत्रकाराच्या हवाल्याने केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही महाजन यांची सीडी मिळाली आहे ना असे म्हणत खडसेंनी लवकरच शाहांना भेटून याबद्दल प्रश्न विचारेन, असे सांगितले. 'गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा' या शीर्षकाचा उल्लेख खडसेंनी केला. त्यांच्या या आरोपानंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, आता खडसेंच्या या आरोपांवर महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खडसेंनी पुरावा द्यावा, मी राजकारण सोडेन, असे आव्हान महाजन यांनी दिले. खडसे पुढे म्हणाले, माझ्या अमित शाहांसोबत बैठका होत असतात. मी त्यांना भेटून यावर चर्चा करेन. जर महाजन यांचे गेल्या दहा वर्षांचे रेकॉर्ड तपासले तर सत्य बाहेर येईल असे मला वाटते.

रात्री 1 वाजता फोन

खडसे म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बोलावलेल्या बैठकीत अमित शाह यांनी महाजन यांना फोन केला होता आणि महिला आयएएसशी असलेल्या त्यांच्या संबंधांबद्दल प्रश्न विचारले होते. त्यानंतर महाजन यांनी आपल्या बचावात म्हटले होते की त्यांना त्यांच्या कामाच्या संदर्भात अनेक अधिकाऱ्यांशी बोलतो. पण शाह यांनी तुमचे कॉल डिटेल्स आमच्याकडे आहेत असे सांगून त्यांना गप्प केले. तुम्हाला रात्री 1 नंतरही फोन आले आहेत. दररोज शेकडो कॉल येत आहेत. सीडी खरे सांगत आहे. तेव्हा शाह यांनी महाजन यांना स्पष्ट शब्दात विचारले होते की. त्या महिलेशी तुमचे काय नाते आहे?

पुरावे द्या, आता राजकारण सोडेन

आरोपांवर उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, खडसेंनी माझ्‌यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत, असे मी त्यांना आव्हान देतो. त्यांनी एकही पुरावा दिला तर मी सक्रीय राजकारणातून बाहेर पडेल. लोकांनी फालतू बडबड करू नये. कधी म्हणायचे मोबाईल हरवला, कधी म्हणायचे डेटा गायब झाला. खोटे बोलताना लाज वाटत नाही? महाजन पुढे म्हणाले की, मी जर एक गोष्टी सांगितली तर लोक जोड्याने मारतील. माझा अंत बघू नका, मी त्या गोष्टीचा खुलासा केला तर खडसेंना तोंड काळे करुनच बाहेर पडावे लागेल. कुण्यातरी भोंदू पत्रकाराला सांगून विषय उचलायला लावायचा, हे बरे नाही.


PostImage

Vaingangavarta19

April 6, 2025    Follow

PostImage

एका शेतकऱ्यांनी केली विहीरीत उडी घेऊन आत्महत्या


एका शेतकऱ्यांनी केली विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

 

अमरावती:-
शेतकऱ्याने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मालेगाव येथे उघडकीस आली. विलास येटे वय ४१ वर्षे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून विलास चंद्रभान येटे शेतकरी मानसिक तणावांमध्ये वावरत होते त्यांच्यावर कर्जाचा डोंगर असल्याने आणि शेतामधून पाहिजे त्या प्रमाणामध्ये पिकाचे उत्पन्न होत नसल्याने ते मानसिक तणाव मध्ये राहत असत असे बोलले जात आहे. मृताचे मामा ज्ञानेश्वर शंकर धुर्वे यांनी पोलीस ठाण्यामध्ये सदर घटनेची तक्रार दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठून आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृताचे शव शव विच्छेदना करिता पाठवीले. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे विलास चंद्रभान येठे यांनी विहिरीमध्ये उड़ी घेऊन आत्महत्या केल्याने गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 6, 2025    Follow

PostImage

कुलिंग मशिनच्या विद्युत तारेच्या झटक्याने अनखोडा येथील तरुणाचा मृत्यू


कुलिंग मशिनच्या  विद्युत तारेच्या झटक्याने  अनखोडा येथील तरुणाचा मृत्यू 


आष्टी -
           पाणी थंड करणाऱ्या कुलिंग मशीनच्या विद्युत तारेच्या झटक्याने अनखोडा येथील 16 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना दिनांक 6एप्रिल रवीवारी संध्याकाळी चार ते साडे वाजताच्या सुमारास घडली 


धीरज प्रमोद येलमुले वय 16 वर्ष रा. अनखोडा तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे 

 मृतक धीरजच्या वडिलांचा अनखोडा येथे थंड पाणी कॅन वितरणाचा चा व्यवसाय आहे. त्यांच्या या व्यवसायात मुलगा धीरज मदत करत होता. रविवारी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास धीरज हा कुलिंग मशीन जवळ गेला असता कुलिंग मशीन च्या विद्युत तारेचा त्याला जोरदार झटका बसला. व तो जागेवरच कोसळला त्याला त्वरीत उपचारासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे


PostImage

Vaingangavarta19

April 5, 2025    Follow

PostImage

सात वर्षांच्या चिमुरडीवर एका नराधमाने केला अत्याचार, त्या नराधमास पोलीसांनी …


सात वर्षांच्या चिमुरडीवर एका नराधमाने केला अत्याचार,  त्या नराधमास पोलीसांनी केली अटक ,कठोर शिक्षेची मागणी.

 

 


रामटेकः- येथून जवळच असलेल्या पेंढरई येथे नातेवाईकांकडे मुंडणाच्या कार्यक्रमाकरिता आलेल्या सात वर्षीय चिमुरडीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना  उघडकीस आली. नराधमाचे नाव रोहीत शामसुंदर सोनवने वय २४ रा पेंढरई असे आहे. पिढित ७ वर्षीय मुलगी मुळची गुजरात येथील रहिवासी असून पेंढरई हे तिच्या आईचे माहेर आहे. आई वडील व लहान भाऊ हे संपूर्ण कुंटूब तिची आई किरण  कडीया वार्ड जामनगर गुजरात येथून पिढीत नाबालीक मुलीच्या मामाच्या मुलाचे मुंडनाचे कार्यक्रमाकरिता मंगळवारी दुपारी २ चे सुमारास आले होते.

सायंकाळी ७ चे सुमारास पिढीत मुलगी दिसत नाही म्हणून तिला शोधण्याकरिता किरण व तिचे नातेवाईक शोध घेवू लागले. तितक्यात तिला नराधम आरोपी रोहीत शामसुंदर सोनवाने त्याच्या घरी घेवून गेल्याची माहिती मिळाली. गावातीलच असल्याने त्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केले गेले परंतू वेळ होत असल्याचे लक्षात येता शोधाशोध सुरु केली असता. आरोपी रोहीत हा त्या मुलीला स्मशान भूमीकडे घेवून गेल्याची माहिती मिळाली. त्या दिशेन शोध घेत गेले असता एका शेताला लागून असलेल्या स्मशान भूमीजवळ पिढित दिसून आली.त्यावेळी तिच्या अंगावर कपडे नव्हते. ती ऐका शेताजवळ जखमी अवस्थेत बसून असल्याचे त्यांना दिसले. हे पाहून सर्व संतापले. तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे स्पष्ट होता. मुलीची आई किरण हिने नातेवाईकांसोबत देवलापार पोलीस ठाणे गाठले व तक्रार केली.

ठाणेदार नारायण तुरकुंडे यांनी रोहीत विरुध्द बी एन एस १३७ (२) व ६५(२) तसेच बालकांचे लैंगीक संरक्षण ४ व ६ अंतर्गत रात्री उशीरा गून्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे. पोलीस कर्मचारी दिपीका भोयर (पारखी) यांनी पिडित बालिकेला नागपूरच्या मेडीकल मध्ये तपासनी करिता भरती केले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ठ झाले असून पुढील तपास देवलापार पोलीस करीत आहेत


PostImage

Vaingangavarta19

April 5, 2025    Follow

PostImage

एक आठवड्याच्या आत पाणी न सोडल्यास मुख्यमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन …


 

एक आठवड्याच्या आत पाणी न सोडल्यास मुख्यमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन -  काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे 

 

काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान,आमदार रामदास मसराम यांचीही उपस्थिती व मार्गदर्शन.

गडचिरोली ::  गडचिरोली - चंद्रपूर जिल्ह्याची जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या  वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले असून नदी काठावरील पाण्याची पातळी खालावली असून शेतकर्यांना शेती करायला अडचणीचा सामना करावा लागत आहे या सोबतच नदी काटावरील गावातील भूजल पातळी कमी झाल्याने अनेक गावकर्यांना पिण्याच्या पाण्याच्या अडचणी सामना करावा लागत असून पाळीव प्राणी, जंगली जनावरे यांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत असल्याने गोसिखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत करण्यात यावा या प्रमुख मागणीस जिल्ह्यातील इतर मागन्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली -चंद्रपूर रोड वरील वैनगंगा नदीच्या पात्रात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनास प्रामुख्याने काँग्रेस विधिमंडळ गट नेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनीही उपस्थिती दर्शविली व मार्गदर्शन करून संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमनध्वनी द्वारे संपर्क करून लवकरात लवकर नदी पात्रात पाणी सोडण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे कळविले.
एक आठवड्याच्या आत नदी पात्रात गोसिखुर्द चे पाणी न सोडल्यास मुख्यमंत्र्याच्या घरसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला.
यावेळी प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार,  युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ऍड. विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला काँग्रेस अध्यक्ष ऍड. कविताताई मोहरकर, जि. प. माजी उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वसंत राऊत, प्रमोद भगत, राजेंद्र बुल्ले, जिल्हा काँग्रेस चे जेष्ठ नेते शँकरराव सालोटकर, प्रभाकर वासेकर, युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश राठोड, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, अब्दुल पंजवानी, नेताजी गावतुरे, दिवाकर निसार, भूपेंश कोलते, रुपेश टिकले, रमेश चौधरी, नितीन राऊत, वामनराव सासाकडे, दामदेव मंडलवार, दत्तात्र्यय खरवडे, अनिल कोठारे, दिलीप घोडाम, सुभाष कोठारे, नितीन राऊत, नरेंद्र गजपुरे, मुन्ना गोंगले, शालिक पत्रे, विजय सुपारे, ढिवरू मेश्राम, उत्तम ठाकरे, जितेंद्र मुनघाटे, जावेद खान, घनश्याम मूरवतकर, मिथुन बाबनवाडे गौरव येणप्रेड्डी वार, विपुल येलट्टीवार, कुणाल ताजने,  प्रफुल बारसागडे, तेजस कोंडेकर, अमर नवघडे, रवी मेश्राम, चंद्रशेखर धकाते सह मोठ्या संख्येने शेतकी व जिल्ह्यातून आलेले गावकरी यावेळी उपस्थित होते.

आंदोलनातील इतर मागण्या >
◆ गडचिरोली येते होणाऱ्या विमानतळाकरीता सुपीक जमिन अधिग्रहित न करता त्यासाठी इतर शासकीय किंवा वनजमिनीचा वापर करण्यात यावा.

◆ भेंडाळा त.चामोर्शी परीसरातील MIDC करिता प्रस्तावित अतिरिक्त क्षेत्र स्थापना करण्याकरिता शासनाने अवलंबिलेले धोरण शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे असून शेतकर्यांशी चर्चा केल्याशिवाय जागा अधिग्रहीत करू नये.
◆कोटगल बँरेज करिता अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेत जमिनीचा मोबदला संबधित शेतकर्यांना मिळाले नसून, योग्य तो मोबदला  त्वरित देण्यात यावा व जे शेती बारमाही पाण्याखाली बुडीत क्षेत्रात येते अश्या शेतीस अतिरिक्त मोबदला देण्यात यावा.
◆मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे थकीत असलेले मजुरीचे पैसे त्वरित देण्यात यावे.
◆वडसा - गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमीनधारक  सर्व शेतकऱ्यांना नवीन दरानुसार जमिनीचा मोबदला देण्यात यावा.


PostImage

Vaingangavarta19

April 5, 2025    Follow

PostImage

महिला तालूकाध्यक्षा भाजपा यांचे अवैध वाळू तस्करीचे ट्रॅक्टर जप्त - …


 महिला तालूकाध्यक्षा भाजपा यांचे अवैध वाळू तस्करीचे ट्रॅक्टर जप्त - चिमूर तहसील तथा पोलीस पथकाची धडक कारवाई

 


चिमूर : - चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात अवैधरित्या वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी सुरु आहे.भाजपाच्या महिला आघाडी चिमूर तालुका अध्यक्ष मायाताई नन्नावरे यांचे अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात जप्त केले असल्याची खात्रीपूर्वक माहीती पुढे आली आहे.

चिमूर तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी फिरते पथक व स्थायी पथक तयार करून रेती चोरट्याना पकडण्याची मोहिम हाती घेतली आहे.दिनांक. 04/04/2025 ला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची दोन ट्रॅक्टर अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना पकडून चिमूर तहसील ला जप्त करण्यात आले.

हि घटना ताजी असतांनाच दुसऱ्या दिवशी दिनांक 05/04/2025 रोजी रात्रीच्या अंधारात पहाटे 3:30 वाजताच्या सुमारास राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथील चौकात गस्तीवर असलेल्या चिमूर तहसील च्या स्थायी पथकाने तहसीलदार राजमाने यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार सूर्यकांत पाटील, रवींद्र चिडे मंडळ अधिकारी, शुभम बदकी तलाठी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी ताळीकोटे व त्यांच्या पाथकांनी मिळून विना नंबर रेती ची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ला पकडून सदरची ट्रॅक्टर जप्तीची कारवाई केली.

याची चर्चा संपूर्ण चिमूर तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात रंगली असून सत्ताधारी राजकीय पक्षाच्या महिला तालूका अध्यक्ष व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीच वाळू चोरीचा उपक्रम सुरु केला असेल तर लोकप्रतिनिधी यांचेकडून जनतेला न्याय कसाकाय मिळवून देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 5, 2025    Follow

PostImage

ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने ७ महिलांचा मृत्यू तर ३ जनी …


 ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडल्याने ७  महिलांचा मृत्यू तर ३ जनी जखमी: प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर.

 

 

नांदेड:-
नांदेड तालुक्यातील आलेगाव येथे  महिला मजुरांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेत 7 शेतमजुर महिलांचा मृत्यू झाला तर 3 शेतमजुर महीला जखमी झाले आहेत. या दुर्घटनेची प्रधानमंत्री व मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने नोंद घेतली आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

तसेच या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर करण्यात आले आहे.वसमत तालुक्यातील गुंज या गावातील 10 शेतमजुर नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात शेत गट क्र 201 मध्ये भुईमुग निंदनीच्या कामासाठी ट्रॅक्टरने जात होते. या शेतात कडघरा नसलेल्या दगडोजी लक्ष्मण शिंदे यांच्या शेतात पाण्याने भरलेल्या विहिरीत ट्रॅक्टर हेड व ट्रॉली सहीत 10 मजुर आज सकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान पडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे.

या दुर्घटनेत जिवंत सुखरुप बाहेर काढण्यात आलेल्यामध्ये श्रीमती पार्वतीबाई रामा भुरड (वय 35), श्रीमती पुरभाबाई संतोष कांबळे (वय 40), सटवाजी जाधव (वय 55) या शेतमजुरांचा समावेश आहे. तर मृत्तांमध्ये श्रीमती ताराबाई सटवाजी जाधव (वय 35), धुरपता सटवाजी जाधव (वय 18), सिमरण संतोष कांबळे (वय 18), सरस्वती लखन भुरड (वय 25), श्रीमती चऊत्राबाई माधव पारधे (वय 45), श्रीमती सपना/मिना राजु राऊत (वय 25), श्रीमती ज्योती इरबाजी सरोदे (वय 30) या महिलांचा समावेश आहे.यावेळी पोलीस प्रशासन व नांदेड वाघाळा मनपाचे शोध व बचाव पथकाचे कर्मचारी, स्थानिक कर्मचारी व ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर शोध व बचाव कार्य संपन्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताचे वृत्त ऐकूण तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. तातडीच्या मदतीची घोषणा केली. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून रुपये पाच लक्ष एवढे अर्थसहाय जाहीर केले.प्रधानमंत्री कार्यालयाने देखील या दुर्घटनेची त्वरेने दखल घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सोबतच प्रधानमंत्री कार्यालयामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृत्तांच्या कुटुंबियांना 2 लक्ष रुपये तर जखमींना 50 हजाराची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेने समाज मन हेलावून गेले आहे. मृत्त सात जणांमध्ये पाच महिला व दोन मुलींचा समावेश आहे. घटनाक्रम यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळी प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांचे विशेष पथक,उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसिलदार संजय वारकड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुन्हे यांच्यासह महसूल विभागाचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी दुर्घटनेत शोध व बचाव कामासाठी तातडीने उपस्थित झाले होते.


PostImage

Vaingangavarta19

April 5, 2025    Follow

PostImage

मुकेश कोडापे या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; अपघात की घातपात? जनमानसात …


मुकेश कोडापे या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; अपघात की घातपात?  जनमानसात अनेक चर्चेला उधाण

 


एटापल्लीः तालुक्यातील जारावंडी गावात एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. काल रात्रीच्या दरम्यान झालेल्या या घटनेमुळे गावात चर्चेला उधाण आले आहे. मृत व्यक्तीचे नाव मुकेश लक्ष्मण कोडापे (वय 28) असे असून तो आपल्या घरापासून सुमारे 100 मीटर अंतरावर नालीच्या काठावर पडलेला आढळला. विशेष म्हणजे त्याच्यावर सायकल पडलेली होती, जी घटनास्थळी आढळली.

काल रात्री गावात अचानक अवकाळी पाऊस झाला होता आणि त्याच दरम्यान विजेचा पुरवठाही खंडित झाला होता. अंधारात काही कळण्याच्या आतच ही घटना घडली असावी, असे काहींचे म्हणणे आहे. ही दुर्दैवी घटना आज सकाळी उघडकीस आली, तेव्हा गावकऱ्यांमध्ये भीती व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेबाबत गावात दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. काही नागरिकांच्या मते, हा एक साधा अपघात आहे, कारण नालीच्या काठावर सायकलसह पडलेल्या अवस्थेत मुकेश आढळला. दुसरीकडे, काही गावकऱ्यांचा असा दावा आहे की हा अपघात नसून काहीतरी घातपात झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत.घटनेची गांभीर्याने नोंद घेऊन जारावंडी पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली आहेत. घटनास्थळाची बारकाईने तपासणी करण्यात आली असून, आजूबाजूच्या परिसरातील लोकांचीही चौकशी केली जात आहे. मृतदेहाला छाविच्छेदना साठी सामान्य रुग्णालय गडचिरोली ला पाठवले असून त्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू राहणार आहे. याबाबत अधिकृत अहवाल आल्यानंतरच या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकेल. दरम्यान, या घटनेबाबत गावात वेगवेगळ्या अफवा व चर्चा सुरू असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुढील माहिती मिळाल्यानंतरच या प्रकरणाचा संपूर्ण खुलासा होऊ शकेल.

“प्राथमिक तपासात घातपाताचे कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाहीत. तथापि, मृतदेहाचे छाविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतरच या प्रकरणाचा खरा कारण समजेल. तपास पूर्ण होईपर्यंत कोणतीही शक्यता नाकारता येणार नाही.


PostImage

Vaingangavarta19

April 5, 2025    Follow

PostImage

आपल्या घरात दरोडा पडला लाखोंचा मालमत्ता लंपास झाल्याचे कळताच घरमालकाने …


आपल्या घरात दरोडा पडला लाखोंचा मालमत्ता लंपास  झाल्याचे कळताच  घरमालकाने सोडला प्राण

 

 

मुर्तिजापूर : शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हातगाव येथे काल शुक्रवार, ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांनी धाडसी दरोडा घालून लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना इतकी भीषण होती की, चोरीचे दृश्य पाहताच घरमालक अशोक नामदेवराव बोळे (वय ६५) यांना जबर मानसिक धक्का बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बोळे कुटुंबीय त्या दिवशी बाहेर गेले होते. संध्याकाळी परतल्यानंतर त्यांनी घर उघडले असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तू मिळून सुमारे ४ ते ५ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. हे दृश्य पाहताच अशोक बोळे यांना तीव्र धक्का बसला आणि ते कोसळले. घरच्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच त्यांचा मुलगा, जो सध्या दुबईमध्ये कार्यरत आहे, तोही तातडीने निघाला असून लवकरात लवकर घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांसह गावकऱ्यांनी घरी धाव घेतली.

गुन्ह्याचा तपास अधिक जलद आणि प्रभावी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तैनात करून तपास सुरू करण्यात आला आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि श्वान पथकासह हे पथक आज मुर्तीजापूरला दाखल होणार आहे. हा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.पोलीस सतर्क, पण चोरीचे प्रमाण वाढतच

गेल्या काही महिन्यांत परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासन वारंवार "सतर्क रहा, जागृत रहा" असा इशारा देत असले तरीही चोरीच्या घटनांमध्ये घट होताना दिसत नाही. नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. घरांमध्ये सीसीटीव्ही बसवणे, सुरक्षारक्षक नेमणे आणि शेजाऱ्यांशी संपर्क ठेवणे यासारख्या उपाययोजना केल्या तर अशा घटनांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.


PostImage

Pankaj Lanjewar

April 5, 2025    Follow

PostImage

मांगली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतींचे लोकार्पण


प्राथमिक आरोग्य केंद्र मांगली येथील नवीन आयुष  अलोपँथिक दवाखाना इमारतीचे लोकार्पण सोहळा पार पडला. 

आज दिनांक 4, वार शुक्रवार ला माजी.  जि.प.सदस्या सौ. प्रमिलाताई दंडारे यांच्या हस्ते पार पडला. कुही ग्रामीण रुग्णालय आणि तितुर प्राथमिक आरोग्य केंद्र दरम्यांनचा लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. 

रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांना शासनांचा मोफत आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी जि.प.सदस्या प्रयत्न करत होत्या. सिल्ली व तितूर सर्कल मध्ये येणाऱ्या मांगली या गावात प्राथमिक आरोग्य केंद्राला मोठी इमारत उपल्ब्ध नव्हती. 

ही इमारत मंजुर होण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या प्रमिलाताई दंडारे यांनी जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद आरोग्य विभागाला पाठपुरावा करून इमारत मंजुर करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून बांधकाम स्थितीत आज पूर्णत्वास येऊन लोकार्पण सोहळा पार पडला. 

 

 प्रसंगी पंचायत समिती माजी उपसभापती वामन श्रीरामे, सामाजिक कार्यकर्ते परमानंद दंडारे, माळणी गट ग्रामपंचायत सरपंच भास्कर सहारे, माजी सरपंच शालिनी धांडे, प्रभारी वैद्यिकय अधिकारी डॉ. खोब्रागडे, डॉ. श्रध्दा सांरगपुरे,औषध वितरण अधिकारी अश्विनी वाकडे, ग्रामस्थ राजकुमार धांडे, विलास धांडे, आरोग्य सेविका सावळे, आरोग्य सेविक नितीन राऊत,आशा सेविका करुणा गजभिये आणि समस्त ग्रामवासी उपस्थित होते. 

 

 


PostImage

Vaingangavarta19

April 5, 2025    Follow

PostImage

रेती तस्करांनी महसूल कर्मचाऱ्यांना दिला का चोप?,परिसरात चर्चेला उधाण


रेती तस्करांनी महसूल कर्मचाऱ्यांना दिला का चोप?,परिसरात चर्चेला उधाण 

 

देसाईगज (गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्रच मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीचे उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याने तसेच शासनाच्या महसूलास कोट्यवधी रुपयांचा चुना लागत असल्याने गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी अवैध रेती वाहतूक उत्खनाला आळा घालण्यासाठी चेकपोस्ट तयार केल्या असून सदरच्या चेकपोस्टवर ईटीपी न केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट निर्देश दिल्याने काही कां असेना, जिल्ह्यात अवैध रेती उपसा व वाहतुकावर थोडाफार तरी आळा बसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. अशातच ज्यांना अवैध रेतीची चोरी केल्याशिवाय दुसरे पर्यायच उरलेले नाही, अश्या मुजोर रेती तस्करांचा कारनामा देसाईगंज तालुक्यात चर्चेचा विषय ठरू लागला आहे. रेती चोरीचा अन् शिवीगाळ करून झोडपल्याचा मामला पुढे आला असल्याने याची वाच्यता कुठेही झाली नसली तरीही 'चोर मचाये शोर' मुळे प्रकरणास वाचा फुटली आहे. वाचा तर फुटली, मात्र प्रकरणात अधिकाऱ्यांनी चुप्पी साधल्याने खालच्या कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात असल्याची चर्चा सर्वत्र दबक्या आवाजात सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देसाईगंज तालुक्या एका छोट्या गावातील रेती घाटावर बुधवार २ एप्रिलच्या मध्यरात्री १ ते १.३० वाजेच्या दरम्यान, चार ते पाच ट्रॅक्टर अवैध रेतीचा उपसा करून वाहतूक करीत असल्याची माहिती एका महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांना गुप्तरित्या मिळाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सिने स्टाईलने अवैध रेती उपसा करणाऱ्या घाटावर धाड टाकली. धाड तर टाकली, पण रेती तस्करी करणारे 'या आणि आम्हाला पकडा' असे म्हणणार तर नाही ना  ? त्यातच काही मुजोर रेती तस्करांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत झोडपले. मध्यरात्रीची घटना असल्याने याबाबत कुठेही वाच्यता झाली नाही. पण 'भिंतीलाही कान असतातच' या म्हणीप्रमाणे हळूहळू घडलेला प्रकार उघडकीस येऊ लागला आहे. अशातच सदर घटनेबाबत आज, शुक्रवार ४ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास देसाईगंज पोलीस ठाण्यात एका पत्रकाराने माहिती घेतली असता, अजून पर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे सांगितले याचे नवल वाटत आहे. त्यामुळे 'हम करेसो कायदा ' याची प्रचिती सदर प्रकारावरून स्पष्टपणे दिसून येत असल्याने रेती तस्करांची आणखीनच मुजोरी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही.


PostImage

Vaingangavarta19

April 5, 2025    Follow

PostImage

मोहफुल संकलन करीत असताना एका इसमाचा वाघाने घेतला नरडीचा घोट


मोहफुल संकलन करीत असताना एका इसमाचा वाघाने घेतला नरडीचा घोट 

 

बोडधा (हळदा) : ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगांव बिटात आवळगांव येथील वृद्ध सकाळी मोहफुल संकलनासाठी जंगलात गेला असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्या इसमाचा नरडीचा घोट घेत  ठार केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या वृद्धाचे नाव मनोहर सखाराम चौधरी रा. आवळगांव असे असुन पोटाची खळगी भरण्याकरीता हंगामी मोहफुल
वेचुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्यासाठी आवळगांव बिटातील कक्ष क्र. ११३८ मोहफुल मध्ये वेचण्याकरीता सकाळी जंगलात एकटाच गेला असता अचानकपणे वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. शेन्डे व मेंडकी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

या परिसरात वाघांची दहशत असुन भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक भयभीत जिवन जगत आहेत. त्यामुळे वनविभागाने गस्त वाढवुन वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मनोहरला पत्नी व मुलगा-मुलगी असा परिवार असुन दक्षिण वनपरिक्षेत्र अधिकारी आर. डी. शेन्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मृतकाचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून पन्नास हजार रूपये देण्यात आले आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 5, 2025    Follow

PostImage

भंगार खरेदी करणाऱ्या तरुणासोबत पळाली धनाढ्य बापाची लेक, मोबाईलमुळे लावला …


भंगार खरेदी करणाऱ्या तरुणासोबत पळाली धनाढ्य बापाची लेक, मोबाईलमुळे लावला पोलीसांनी शोध 

 

नागपूर . धनाढ्य असतानाही तिने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. त्यानेही तिच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला. दोघांनीही एकमेकांना सोबत राहण्याचे वचन दिले. घरापासून शेकडो किमी दूर निघून गेले. नोएडात संसार थाटला. परंतु त्यांनी मोबाईल सुरू करण्याची चूक केली आणि त्यांच्या छोट्याशा लव्ह स्टोरीचा 'दी एण्ड' झाला. भावाच्या रागावर घर सोडल्याची कबुली पाहून आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रूची (काल्पनिक नाव) बीएसस्सीच्या प्रथम वर्षाला शिकते. वडिलांचा मोठा व्यवसाय आहे. एकुलती एक असल्याने रूची सर्वांच्या लाडाची. रूची 20 वर्षांची तर तिचा मित्र ऋषी (काल्पनिक नाव) 21 वर्षांचा आहे. कधी ई रिक्षा चालवितो तर कधी भंगार खरेदी विक्रीचे काम करतो. वडील आजारी असल्याने त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. एकदा रूची त्याच्या ई रिक्षात बसली. तेव्हापासून तो तिच्याकडे आकर्षित झाला. तो कधी तिच्या महाविद्यालयाकडे फेऱ्या तर कधी भंगार खरेदीसाठी तिच्या घराकडे जायचा. यातूनच त्यांची ओळख झाली. दोघांनीही एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि चॅटींग सुरू झाली. दोघेही फुटाळा, अंबाझरी परिसरात भेटायचे. जानेवारी महिन्यात ती ऋषीसोबत चॅटींग करीत असताना तिच्या भावाने पाहिले. त्याला प्रचंड राग आला. त्याने रूचीच्या कानशिलात लगावली. संतप्त झालेल्या रूचीने तेव्हाच घरून निघून जाण्याचा निर्णय घेतला.

मोबाईल सुरू करण्याची केली मोठी घोडचूक :

एएसआय नत्थू ढोबळे यांनी रूचीचा ठिकठिकाणी शोध घेतला. मोबाईल नसल्याने काहीच सुगावा लागला नव्हता.अखेर 27 मार्चला त्याने मोबाईल सुरू केला आणि पोलिसांना लोकेशन मिळाले. एएसआय ढोबळे, महिला अंमलदार संगीता तावरे पथकासह नोएडाला पोहोचले. मात्र, ठोस लोकेशन मिळत नसल्याने त्यांनी एसडीआर काढला. त्यांना ठोस पत्ता मिळाला. काही वेळातच पोलिस घराजवळ पोहोचले. एक युवक ई रिक्षा घेवून आला. त्याचे नाव विचारताच रूची घरातून बाहेर आली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन नागपुरात आणले. कायदेशीर कार्यवाहीनंतर रूचीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

दोघांनीही नवीन शहरात जाण्याची योजना आखली. 6 फेब्रुवारीच्या रात्री 11.30 वाजता आई-वडील झोपेत असताना ती घरून निघाली. तिकडे अती तयारच होता. दोघेही सक्करदरा परिसरातील एका धार्मिक स्थळी थांवले. दुसऱ्या दिवशी एमपी बस स्थानकाहून भोपाळला निघाले, तेथे दोन दिवस थांबले. तिसऱ्या दिवशी रेल्वेने नोएडासाठी निघाले. घरून निघताना त्रखीकडे दीड हजार रुपये होते. गौतम बुद्धनगरात त्याने दीड हजार रुपये महिना भाड्याने खोली घेतली. कसे-बसे त्यांनी काही दिवस काढले. दरम्यान तो कामाच्या शोधात होता. त्याने ई रिक्षा चालविण्याचा निर्णय घेतला. तो भाङचाची रिक्षा चालवायचा. त्या झोपडीतही ती आनंदात होती. तब्बल दीड महिना आनंदात गेला. इकडे दोघांच्याही कुटुंबीयांनी ठाण्यात मिसिंग तक्रार केली होती.


PostImage

Vaingangavarta19

April 4, 2025    Follow

PostImage

नागपुरात गोळी झाडून तरुणाची हत्या, दोघे जखमी तर तीन आरोपींना …


नागपुरात गोळी झाडून तरुणाची हत्या, दोघे जखमी तर तीन आरोपींना अटक

 

 

नागपूर: मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोधनीतील प्रकाशनगर परिसरात भर भाजी बाजारात चौघांनी शिवीगाळ करीत गोळीबार केला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एक ग्राहक जखमी झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता व पोलिसांना बंदोबस्त तैनात करावा लागला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. सोहेल असे मृताचे नाव आहे. प्रकाशनगर येथील गोविंद लॉनजवळ ही घटना घडली. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास बाजारात चार आरोपी गाडीने आले व त्यांनी तेथील ठेल्यांजवळ गाडी थांबविली. तेथील तरुणांना शाहरूख कुठे आहे असे विचारत आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. एकाने देशी पिस्तूल काढत गोळीबारच सुरू केला. त्यातील एक गोळी लागून सोहेल खान (३५) नावाचा तरुण जखमी झाला. तर भाजी विकत घेण्यासाठी आलेल्या मो. सुलतान उर्फ मो. शफी याच्या मानेला चाटून गोळी गेली व तोदेखील जखमी झाला. घटनास्थळावर एक जिवंत काडतूसदेखील आढळले. या घटनेमुळे खळबळ उडाली व पळापळ झाली. मानकापूर पोलिस ठाण्याच्या पथकाला याची माहिती देण्यात आली. पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले व सोहेलला मेयो इस्पितळात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. धीरज घोडमारे, राजेंद्र मरकाम व भूषण अशी आरोपींची नावे आहेत. तर चौथा आरोपी चंदू डोंगरे हा फरार आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी पोहोचले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिस घटनास्थळावरील तणाव शांत करण्याचा प्रयत्न करत होते.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. काही संतप्त तरुणांनी घोषणाबाजी करत काही दुचाकींची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. भाजीचा ठेला लावण्यावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मेयो इस्पितळासमोर देखील लोक जमले होते व तेथेदेखील तणाव निर्माण झाला होता. तेथे तहसील पोलिस ठाण्यातील पथकाचा बंदोबस्त लावण्यात आला होता


PostImage

Vaingangavarta19

April 4, 2025    Follow

PostImage

सम्राट अशोक राजाच्या शिलालेखांचे गाढे अभ्यासक अशोक तपासे यांना फ्रॅंकफोर्ड …


 

सम्राट अशोक राजाच्या शिलालेखांचे गाढे अभ्यासक
अशोक तपासे यांना फ्रॅंकफोर्ड युनिव्हर्सिटीकरून डॉक्टरेट प्रदान !

लेणीसंवर्धन चळवळीकडून अशोक तपासे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

 

मुंबई दि. ०४ मार्च, २०२५ :

देशभरातील सम्राट अशोक राजांच्या शिलालेखांचा गाढे अभ्यासक आणि शिलालेखांचे प्रत्यक्षात जागेवर जाऊन वाचन करणारे अशोक तपासे यांना फ्रॅंकफोर्ड युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. शिलालेखांच्या अच्युत कामगिरीची पोचपावती म्हणून त्यांना ही डॉक्टरेट देण्यात आली आहे. त्यामुळे लेणी संवर्धन चळवळीकडून तपासे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. 

मुंबई:-

अशोक तपासे यांनी २००९पासून पालि भाषेचे अभ्यासक आहेत. त्याचा शिलालेखांचा अभ्यास सुद्धा आहे. ब्राह्मी लिपी शिकून त्यांनी भारतभर भ्रमण केले. जेथे जेथे सम्राटांचे शिलालेख आहेत. त्या स्थळांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. कालसी (उत्तराखंड ) ते ब्रह्मगिरी (कर्नाटक ) आणि जुनागड (गुजरात ) ते जोऊँगडा (ओरिसा)पर्यंत त्यांनी ३५ शिलालेखांचे वाचन केले. वेगवेगळ्या स्थळांवरील शिलालेखातील मजकूर व त्याच्या आशयाबाबत त्यांना फरक जाणवला व तो त्यांनी शोध निबंधातून मांडला आहे.

२०१४ मध्ये शिलालेखावर पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये त्याची हिंदी आवृत्ती आली. त्याच वर्षी त्यांनी श्री श्री विद्यापीठ येथे शोधनिबंध सादर करून बुद्ध यांचे महापरिनिर्वाण इ. स. पूर्व ५१६ मध्ये झाले असल्याचे शिलालेखावरून स्पष्ट होते असल्याचा पुरावा अधोरेखित केला. या शोध निबंधाचे हिंदी भाषांतर करून त्यांनी जबलपूर व तेलंगणा येथील सोशल सायन्स अँड मॅनेजमेंट स्टडीज आणि एपीग्राफिकल सोसायटी ऑफ इंडिया यांना सादर केले. म्हणूनच फ्रॅंकफोर्ड युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टरेट प्रदान करून त्यांचा गौरव केला आहे.

सध्या ते भारतीय बौद्ध कालमापनावर संशोधन करीत असून स्वतंत्र बौद्ध कालमापन पद्धती कशी अवलंबिता येईल याचा अभ्यास करीत आहेत. अशोक तपासे हे इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदविका धारक आहेत. समता नगर येथील टेलिफोन कार्यालयातून निवृत्त झाल्यावर शिलालेखांच्या प्रांगणात त्यांनी भरारी कामगिरी केली आहे.
------------------------------------------------ 


PostImage

Vaingangavarta19

April 4, 2025    Follow

PostImage

गोसिखुर्द धरणाचे पाणी सोडण्यासह इतर मागन्यांना घेऊन 5 एप्रिल रोजी …


गोसिखुर्द धरणाचे पाणी सोडण्यासह इतर मागन्यांना घेऊन 5 एप्रिल रोजी काँग्रेसचे वैनगंगा नदीपात्रात ठिया आंदोलन - मोठ्या संख्येने शेतकऱ्यांसाह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे आवाहन

 

 

गडचिरोली::  गोसीखुर्द धरणातील  पाणी  तातडीने सोडण्यात यावे, गडचिरोली येते होणाऱ्या विमानतळाकरीता सुपीक जमिन अधिग्रहित न करता त्यासाठी इतर शासकीय किंवा वनजमिनीचा वापर करण्यात यावा, भेंडाळा त.चामोर्शी परीसरातील MIDC करिता प्रस्तावित अतिरिक्त क्षेत्र स्थापना करण्याकरिता शासनाने अवलंबिलेले धोरण शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे असून शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय जागा अधिग्रहीत करू नये, कोटगल बँरेज करिता अधिग्रहीत करण्यात आलेल्या शेत जमिनीचा मोबदला संबधित शेतकऱ्यांना मिळाला नसून, योग्य तो मोबदला  त्वरित देण्यात यावा व जे शेती बारमाही पाण्याखाली बुडीत क्षेत्रात येते अश्या शेतीस अतिरिक्त मोबदला देण्यात यावा, मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे थकीत असलेले मजुरीचे पैसे त्वरित देण्यात यावे, वडसा - गडचिरोली नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पाकरिता अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमीनधारक  सर्व शेतकऱ्यांना नवीन दरानुसार जमिनीचा मोबदला देण्यात यावा यासह जिल्ह्यातील इतर मागण्यांना घेऊन, दिनांक 5 एप्रिल 2025  रोजी,  दुपारी 1.00  वाजता, गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने , चंद्रपूर रोड वरील वैनगंगा नदी पात्रात , पुलीयाच्या खाली ठीय्या आंदोलन करण्यात येणार असून मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, जिल्ह्यातील शेतकरी, नदी काठावरील गावाकऱ्यांनी आंदोलनास उपस्थित रहावे असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे. 

आंदोलन दिनांक - 05 एप्रिल 2025
वेळ - दुपारी 1.00 वाजता 
ठिकाण- वैनगंगा नदी पुलिया खाली ( चंद्रपूर रोड )


PostImage

Vaingangavarta19

April 3, 2025    Follow

PostImage

नौकरी लाउन देतो म्हणून तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले व बंदुकीचा …


नौकरी लाउन देतो म्हणून तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले व बंदुकीचा धाक दाखवून केला बलात्कार 

 

डोंबिवली :-

डोंबिवलीतून एक अस्वस्थ करणारी बातमी समोर आली आहे, जिथे एका ठगाने एका मुलीला फसवले, तिला फोन  करून बोलावून बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. मात्र, मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणि तपासही सुरू केला आहे. रीलबाज सुरेंद्र पाटील आणि त्यांच्या ड्रायव्हरविरुद्ध मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे प्रकरण डोंबिवली येथील आहे, जिथे एका १९ वर्षीय मुलीने डोंबिवलीजवळील ठाकुर्ली येथील रीलबाज सुरेंद्र पाटील यांच्याविरुद्ध मानपाडा पोलिस ठाण्यात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ आरोपी पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल केला. पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, ही घटना १६ फेब्रुवारी ते २९ मार्च दरम्यान डोंबिवली पूर्वेतील दावडी परिसरात घडली

नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन

सुरेंद्र पाटील यांची इन्स्टाग्रामवरून मुलीशी मैत्री झाली होती, त्यानंतर त्यांनी  मोबाईल नंबरची देवाणघेवाण केली. त्यानंतर आरोपीने मुलीला विमानतळावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले, या संदर्भात त्याने तिला डोंबिवलीला बोलावले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. मुलीने तिच्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की जेव्हा तिने त्याला असे करण्यास विरोध केला तेव्हा त्याने तिला बंदूक दाखवली आणि तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.


PostImage

Vaingangavarta19

April 3, 2025    Follow

PostImage

एस .टी. बस ही गरीब आणि मध्यमवर्गीयांची जीवनदायिनी -आमदार सुधीर …


एस .टी. बस ही गरीब आणि मध्यमवर्गीयांची जीवनदायिनी -आमदार सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर जिल्ह्यासाठी 10 नवीन बसेस मंजूर, पहिल्या टप्प्यात 5 बसेसचे लोकार्पण

चंद्रपूर, दि. 3:  चंद्रपूर जिल्ह्यासाठी दहा नवीन बसेस मंजूर करण्यात आल्या असून, एसटी महामंडळाच्या सेवेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. या नव्या बसेस केवळ वाहने नसून, जनतेच्या विश्वासाचं, संवादाचं आणि सेवाभावाचं प्रतीक आहेत. प्रत्येकाचा प्रवास अधिक सोयीचा, सुरक्षित आणि सुसज्ज व्हावा, जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. चंद्रपूर हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील जिल्ह्यांपैकी एक असून, एसटी ही गरीब आणि मध्यमवर्गीयांची जीवनदायिनी असल्याचे मत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

चंद्रपूर बसस्थानक येथे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागातर्फे मंजूर झालेल्या दहा नव्या बसेसपैकी पहिल्या टप्प्यातील 5 बसेसला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी चंद्रपूरच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे, विभागीय वाहतूक अधिकारी पुरुषोत्तम व्यवहारे, आगार व्यवस्थापक अंकुश खाडिलकर, विभागीय अभियंता (स्थापत्य) ऋषिकेश होले, बसस्थानक प्रमुख हेमंत गोवर्धन, कार्यशाळा अधीक्षक मनोज डोंगरकर, वाहतूक निरीक्षक अंकित कामतवार, सहाय्यक वाहतूक निरीक्षक प्रकाश तोडकर, बंडू गौरकार आदी उपस्थित होते.

आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मी अर्थमंत्री असताना एसटी महामंडळाला सर्वाधिक निधी उपलब्ध करून दिला होता. याचे कारण म्हणजे श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या वाहनाने प्रवास करू शकतो, परंतु गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी एसटी हा प्रवासाचा आधार आहे. सर्वांच्या सुखदुःखामध्ये एसटी महामंडळाने साथ दिली आहे. चंद्रपूर, बल्लारपूर आणि मुल या बस स्थानकांसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या बसस्थानकांच्या नूतनीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला. परिवहन मंत्र्यांनी निधी न मागता देखील 700 नवीन बस खरेदीसाठी निधी दिला. त्याचबरोबर ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मुंबईतील नोकरी करणाऱ्या महिलांसाठी 'तेजस्विनी' वातानुकूलित बसेस उपलब्ध करून दिल्यात.

चंद्रपूर जिल्ह्यासाठी 200 नवीन बसेस मंजूर करण्यात आल्या होत्या, त्यापैकी 100 बसेस जिल्ह्याला मिळाल्या असून उर्वरित 100 बसेस लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे चंद्रपूर जिल्ह्याला भेट देणार असून, येथील वाहन चालकांची पदे, त्यांच्या निवास व्यवस्थेबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येईल. मुल येथे बस डेपो उभारण्यासाठी जागा निश्चित झाली असून, त्याच्या उभारणीसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यासंबंधी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लवकरच चंद्रपूर दौऱ्यासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याचेही आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. एसटी महामंडळाची सेवा अधिक सक्षम व कार्यक्षम होईल आणि प्रवाशांना उत्तम सुविधा मिळतील, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केला.

यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बस स्थानकातील विविध स्टॉलला भेटी दिल्या व शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.